Site icon

नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवरात्रोत्सवातील अष्टमीला रात्री १२ नंतर जन्मास आलेल्या बालिकांचे व त्यांच्या मातांचे साडी, बालिकांसाठी कपडे, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले.

नवरात्रोत्सवात दरवर्षी जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार अष्टमीला जन्मास येणाऱ्या दुर्गांचा व त्यांच्या मातांचा सत्कार करण्यात येतो. त्यानिमित्त जिल्हा रुग्णालयातील प्रसूती पश्चात कक्षात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उत्कर्ष दुधेडिया, माता बालसंगोपन अधिकारी डॉ. नेहते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह इतर अधिकारी, अधिसेविका शुभांगी वाघ, परिसेविका, परिचारिका, कर्मचारी आदी उपस्थित होते. ॲड. सुवर्णा शेफाळ यांनी सूत्रसंचलन केले. तर दीपक जाधव यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव : जिल्हा रुग्णालयात स्त्रीजन्मोत्सव सोहळा साजरा करत ‘दुर्गां’चे स्वागत appeared first on पुढारी.

Exit mobile version