Site icon

नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गेल्या अडीच वर्षांपासून पेंग्विनबरोबर राहण्याची सवय झाली आहे. यामुळे चित्त्यांच्या आगमनाने त्यांना भीती वाटू लागली आहे की काय, असा प्रश्न भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित करत पटोलेंवर खोचक टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७०च्या दशकानंतर देशात नष्ट झालेले चित्ते दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया देशातून भारतात आणले. त्यावर नाना पटोले यांनी टीका केली हाेती. त्यावर भाजप आमदार फरांदे यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधत जणू काही या चित्त्यांचा प्रवेश भाजपात झाला आहे, असे समजून काँग्रेसच्या नेत्यांकडून चित्त्यांवर टीका होत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीदेखील हीच री पुढे चालवली आहे. चित्त्यांचा भाजपात प्रवेश झालेला नाही, असे सांगत आमदार फरांदे यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिले आहे.

चित्त्यांच्या येण्यामुळे प्राण्यांमध्ये आजार निर्माण झाला आहे, असा तथ्यहीन शोध पटोले यांनी लावला. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला कंटाळून काँग्रेसचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश घेत आहेत, याकडे नाना पटोले यांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही आमदार देवयानी फरांदे यांनी पटोलेंना दिला आहे.

हेही वाचा :

The post नाना पटोलेंना पेंग्विनबरोबर राहण्याची सवय : आमदार देवयानी फरांदे यांची खोचक टीका appeared first on पुढारी.

Exit mobile version