Site icon

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काल (दि. 18 ) शिंदे गटाच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते, त्यात हेमंत गोडसेंनी देखील हजेरी लावल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेचा 12 खासदारांचा गट शिंदे गटात जाणार असून यात हेमंत गोडसे यांचे नाव अग्रस्थानी आहे. खासदार गोडसे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या काही अंतरावरच शिवसेनेचे कार्यालय आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी नाशिकमधील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे व दादाभुसे हे दोघेही शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्याही कार्यालयाबाहेर अशा स्वरुपाची सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

हेही वाचा :

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Exit mobile version