Site icon

नाशिकच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण

नाशिक (उगांव ता. निफाड) : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्यातील उगांव येथील मुळचे रहिवाशी असलेले भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (३२) यांना जम्मू काश्मिर येथे कर्तव्यवावर असतांना वीरमरण आले असल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांना फोनद्वारे मिळाली आहे.

निफाड तालुक्यातील उगांव येथील रहिवाशी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे ते सुपूत्र आहेत. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगांव येथे झाले होते. १२ वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातुर येथे भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश घेतला होता.

२००६-२००७ मध्ये सर्वप्रथम कच्छभोज त्रिपुरा आसाम आणि आता जम्मू काश्मिर येथे सेवा बजावत होते. तीन वर्षानंतर त्यांची सेवा संपणार होती.  त्यांचे वडील उत्तम बाबुराव ढोमसे व आई हिराबाई उत्तमराव ढोमसे हे शेती व्यवसायानिमित्त मरळगोई खुर्द येथे स्थलांतरीत झालेले आहे.  त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा तसेच पत्नी रोहीणी, मुलगा पवन(वय वर्ष 8), मुलगी आरु (वय वर्ष २ ), भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे. दरम्यान याबाबत स्थानिक प्रशासनाकडे अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

बालपणापासून जनार्दन यास देशसेवेची आवड होती. शिक्षण घेत होता त्याचवेळी त्याचा कल हा सैन्यदलाकडे होता. सेवा पूर्ण होण्यापू्र्वीच त्याला वीरमरण आले. १ जानेवारीला तो घरी येणार होता.
– ज्ञानेश्वर ढोमसे
जवान जनार्दनचे चुलते

हेही वाचा :

The post नाशिकच्या जवानाला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Exit mobile version