Site icon

नाशिकच्या दातलीत भरदिवसा बिबट्याचे दर्शन, रात्री-अपरात्री शेतात जाण्यास धजेना शेतकरी

नाशिक (दातली) पुढारी वृत्तसेवा

दातली परिसरात बिबट्या सतत दर्शन देत असल्याने रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाणारे शेतकरी धास्तावले आहेत. दातली बाजूने खंबाळे वन विभागाच्या हद्दीलगत शेतामध्ये बिबट्या मुक्त संचार करत असल्याचे काही शेतकर्‍यांनी बघितले होते. परंतु प्रत्यक्षदर्शीकडे पुरावा नसल्याने ही केवळ अफवा असल्याचे बोलले जात होते. मात्र, शनिवारी (दि.12) राहुल आव्हाड व विलास आव्हाड हे तरुण ट्रॅक्टरने शेतीची मशागत करत असताना त्यांना बिबट्याने दर्शन दिले. त्यांनी तत्काळ मोबाइलमध्ये व्हिडीओ काढला. तसेच याबाबत सरपंच हेमंत भावड, पोलिसपाटील सुनील चांदोरे यांना याबाबत माहिती दिली.

सध्या सुगीचे दिवस असल्याने शेतकरी रात्री-अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जात असतात. तसेच दिवसाही पशुपालक व शेतकरी शेतामध्ये काम करत असतात. बिबट्याच्या दर्शनामुळे दातली परिसरात दहशत पसरली असून, वनविभागाच्या वतीने तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या दातलीत भरदिवसा बिबट्याचे दर्शन, रात्री-अपरात्री शेतात जाण्यास धजेना शेतकरी appeared first on पुढारी.

Exit mobile version