Site icon

नाशिकच्या पाच खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत खेळाडूंना प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार नाशिकच्या पाच खेळाडूंना जाहीर झाला आहे. त्यात सन २०१९-२० या वर्षासाठी तलवारबाजीतत जय सुरेश शर्मा, तर कयाकिंग/ कनॉईंग स्पर्धेत सागर दत्तात्रय नागरे याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. सन २०२१-२२ या वर्षासाठी बेसबॉल खेळामध्ये मंजुषा अशोक पगार यांना, तर अॅथलेटिक्समध्ये सर्वेश अनिल कुशारे यांना तर रोईंग या खेळात नीलेश धनंजय धोंडगे यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहिर झाला आहे. कोरोनामुळे मागील तीन वर्ष पुरस्कार देण्यात आलेले नव्हते. 

हेही वाचा :

The post नाशिकच्या पाच खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर appeared first on पुढारी.

Exit mobile version