Site icon

नाशिकमधील सिटीलिंक बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल

नाशिक : पुढारी ऑनलाइन

नाशिकमधील महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा सकाळपासून ठप्प झाली आहे. काही कर्मचाऱ्यांनी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.

तपोवन स्थानकात सकाळपासून कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तीन महिन्यांपासून पगार होत नसल्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे नाशिककरांसाठी लाईफलाइन झालेली सिटीलिंक शहर बससेवा सकाळपासून ठप्प झाली आहे.

10 तारखेच्या आत पगार तुमच्या खात्यावर जमा होईल असे आश्वासन दिले गेले होते. मात्र  पगार वेळेवर होत नसल्याची तक्रार कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी थेट संप पुकारला असून प्रवाशांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागतो आहे.

The post नाशिकमधील सिटीलिंक बससेवा ठप्प; प्रवाशांचे हाल appeared first on पुढारी.

Exit mobile version