Site icon

नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विविध कार्यक्रमांमधील भाषण असो वा वक्तव्ये यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनेकदा चर्चेत राहिले आहेत, तर कधी त्यावरून वादविवादही निर्माण होत असतात. नाशिकमध्येदेखील ते चर्चेत राहिले खरे; मात्र वादग्रस्त विधानावरून नव्हे, तर आदिवासी नृत्यावर ठेका धरल्यामुळे. त्यांच्यासोबत आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित आणि विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही ठेका धरला.

आदिवासी विकास विभागातर्फे नाशिकमध्ये मंगळवारपासून (दि.15) चार दिवस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज्यातील विविध भागांतून आलेल्या आदिवासी कला पथकांनी आपले नृत्य सादरीकरण केले. चंद्रपूर येथील पथकाचे आदिवासी नृत्य सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यासपीठावरून उठत आपल्या सोबत ना. विजयकुमार गावित आणि नरहरी झिरवाळ यांना घेतले. उपस्थित असलेल्या प्रेक्षक तसेच आदिवासी बांधवांना क्षणभर काही समजले नाही की, राज्यपाल कुठे चालले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी तडक आदिवासी नृत्य सुरू असलेल्या ठिकाणी जात तरुण-तरुणींसोबत काही काळ ठेका धरला. राज्यापालांसह मंर्त्यांच्या नृत्यामुळे महोत्सवात एक वेगळाच रंग भरला. याच ठेक्यात विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळदेखील सहभागी झाले होते. झिरवाळ हे त्यांच्या पैत्रा आणि आदिवासी नृत्य या दोन्ही प्रकारांसाठी प्रख्यात आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये राज्यपालांसह मंत्रीही आदिवासी नृत्यावर थिरकले appeared first on पुढारी.

Exit mobile version