Site icon

नाशिकमध्ये सिटी लिंक वाहकांचे पुन्हा काम बंद आंदोलन, प्रवाश्यांचे हाल

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

सिटी लिंक बसच्या वाहकांनी (दि १८) रोजी काम बंद आंदोलन केले. पगार द्या, पगार द्या अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे सकाळ पासून सिटी लिंक बस सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रवाश्यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसुन येत आहे.

सिटी लिंक बस डेपो, तपोवन या ठिकाणी सकाळीच्या सुमारास सिटी लिंक बस सेवेत कार्यरत असलेल्या वाहकांनी आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यांपासून पगार होत नसल्याने त्यांनी आंदोलन पुकारले आहे. महापालिकेच्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याने सिटी लिंककडून ठेकेदाराला झालेला दंड कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याचा ठेकेदाराचा इरादा असल्यानेच वाहकांचा पगार थांबविण्यात आल्याचे बोलले जात आहे. आधीच दोन महिने पगार नाही. त्यात दंड कसा भरायचा असा पेच कर्मचाऱ्यासमोर उभा राहिला आहे.

संप करू नये याकरिता दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे संपाकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत पोलिस ठाणे, मनपा आयुक्त व कामगार आयुक्त यांना देखील पत्रव्यवहार केल्याचे समजते. थकीत पगार मिळावा, दरमहा पगार वेळेवर व्हावा. अश्या मागण्या या वाहकांच्या आहेत.

The post नाशिकमध्ये सिटी लिंक वाहकांचे पुन्हा काम बंद आंदोलन, प्रवाश्यांचे हाल appeared first on पुढारी.

Exit mobile version