Site icon

नाशिक : ‘अंनिस’ कायदा रद्दसाठी साधू-महतांचे आंदोलन

 नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा धाक केवळ हिंदू साधू महंत यांनाच दाखवला जातो. त्यामुळे राज्य सरकारने अंनिस कायदा रद्द करावा, या मागणीसाठी शहरातील साधू-महंत यांनी सोमवारी (दि.२३) रामकुंडावर आंदोलन केले.

जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करण्यात आला. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील जुना आखाड्याचे महंत हर्षदभारती, महंत सुधीरदास पुजारी, अनिकेतशास्त्री देशपांडे, गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, काळाराम मंदिराचे विश्वस्त धनंजय पुजारी, हिंदू एकता आंदोलनचे रामसिंग बावरी, लव जिहाद संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष गजू घोडके आदी उपस्थित होते. अंनिस कायदा केवळ हिंदू धर्मातील साधू महंत यांच्यावरच लागू होताना दिसून येत आहे. परंतु मौलाना, पाद्री, भन्ते आदी जादूटोणा करत असताना, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे राज्य सरकारने अंनिस समिती बरखास्त करावी. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करण्यात यावा. यापुढे असा पाखंडीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे यावेळी महंत सुधीरदास पुजारी यांनी राज्य सरकारला इशारा दिला.

…तर ५१ लाखांचे बक्षीस

मौलाना, पाद्री, भन्ते जे दैवी शक्ती असल्याचा दावा करतात व भाविक भक्तांना लुबाडण्याचे काम करीत आहेत. तसेच त्यांच्या भोळेपणाचा व भावनिक मनोवृत्तीचा गैरफायदा घेतात. त्यांनी दैवी शक्ती सिद्ध करावी आणि ५१ लाख रुपयांचा धनादेश घेऊन जाण्याचे खुले आव्हान अनिकेतशास्त्री यांनी यावेळी केले.

हेही वाचा :

The post नाशिक : 'अंनिस' कायदा रद्दसाठी साधू-महतांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version