Site icon

नाशिक : अजित सुराणा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त जीवनसाधना गौरव पुरस्कार नीती आयोगाचे सदस्य पद्मश्री भिकूजी (दादा) इदाते यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला.

उदयोग, समाजसेवा आणि शैक्षणिक कार्यातील योगदानाबद्दल अजित सुराणा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या आबड-लोढा- जैन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्ता शिंपी यांना उत्कृष्ट शारीरिक संचालक, तर वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनोज पाटील यांना उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, महाविद्यालयाचे समन्वयक, विश्वस्त व प्रबंध समितीचे सदस्य कांतीलाल बाफणा व सी. ए. महावीर पारख, संस्थेच्या विश्वस्त व प्रबंध समितीचे सर्व मान्यवर सदस्यांनी तसेच प्राचार्य डॉ. गोटन जैन, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर यांनी अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : अजित सुराणा यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान appeared first on पुढारी.

Exit mobile version