Site icon

नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी

यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा: यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेल्या एका खासगी बसचा आज (दि.८) पहाटे नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. यात १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी प्रवास करीत होते.
यवतमाळ येथून एका खासगी कंपनीची (MH२९-AW ३१००) बस शुक्रवारी ७ सप्टेंबरला दुपारी ३:३० वाजता मुंबईसाठी निघाली होती. यात यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी होते. त्यामध्ये यवतमाळ शहरातील ५, दिग्रस ७, पुसद ४, आर्णी येथील २ प्रवासी होते. यातील काही जखमी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील काही प्रवासी मृत झाले झाल्याचे वृत्त आहे.

बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिकचे प्रवासी बसवल्याचे निदर्शनास आले आहे. या दुर्घटनेची चौकशी करून कारवाईचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. पालकमंत्री राठोड यांनी अपघातग्रस्त बसच्या कार्यालयाला भेट दिली. संचालकांकडून प्रवाशांबाबत माहिती घेतली. या अपघातात बसला आग लागण्यामागे कारण काय, ट्रॅव्हल्समध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती काय ? याबाबत माहिती घेऊन मृतांबाबत संवेदना व्यक्त केल्या. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८, वाशीम येथील ६, मालेगाव येथील ४ मेहकर येथील ३ प्रवासी बसल्याची माहिती बस कंपनीच्या कार्यालयातून मिळाली.

हेही वाचलंत का ? 

The post नाशिक अपघातग्रस्त बसमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील १८ प्रवासी appeared first on पुढारी.

Exit mobile version