Site icon

नाशिक : अश्लील सीडी विक्रेत्याला तीन महिने सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अश्लील चित्रफीत असलेल्या सीडी विक्रेत्याला न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ विश्वनाथ कोळपकर (४२, रा. जुनी तांबट लेन, भद्रकाली) असे या आरोपीचे नाव आहे. तो भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत दि. २६ जुलै २०११ रोजी हातगाडीवर अश्लील चित्रफीत असलेल्या सीडी विक्री करताना आढळला होता.

त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस अंमलदार आर. ई. सय्यद यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. आर. सपकाळे यांनी युक्तिवाद केला. सोमनाथविरोधात गुन्हा शाबित झाल्याने अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. गादिया यांनी त्याला शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार व्ही. पी. पाटील, बी. कापडणीस यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक : अश्लील सीडी विक्रेत्याला तीन महिने सश्रम कारावास appeared first on पुढारी.

Exit mobile version