Site icon

नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या

निफाड : पुढारी वृत्तसेवा
आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल दिला नाही म्हणून याचा राग येऊन नैताळे येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे या इयत्ता 6 वी मध्ये शिकणार्‍या 12 वर्षे वयाच्या मुलाने घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या बाबत निफाड पोलिसांकडून कळालेली माहिती अशी की, नैताळे येथील आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुरासे व पत्नी भारती सुरासे आपल्या दोन मुलांसमावेत राहतात. ते मोलमजुरी करून कुटुंबाचे पालन पोषण करतात त्यांचा एक मुलगा इयत्ता सहावी तर दुसरा इयत्ता तिसरीत प्राथमिक विद्यामंदिर नैताळे या नाशिक जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. त्यातील इयत्ता 6 वी मध्ये शिकत असलेला 12 वर्ष वयाच्या ऋषिकेशने आई भारती यांच्याकडे गेम खेळण्यासाठी मोबाइल मागितला. भारती यांनी अभ्यास कर असे म्हणत त्यानी ऋषिकेशला मोबाइल देण्यास नकार दिला. त्यानंतर त्या बाजारात गेल्या. परतल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना ऋषिकेश ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनेची माहिती कुटुंबाने निफाड पोलिसांना दिली.पोलिसानी पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. निफाड येथे विच्छेदनानंतर ऋषिकेश चा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देशमुख करीत आहेत.

शिक्षकांनीही केले दुःख व्यक्त

आदिवासी वस्तीमध्ये राहणारा ऋषिकेश सुराशे हुशार विद्यार्थी होता. शाळेच्या वतीने त्याला गणवेशही देण्यात आला होता. झालेल्या घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक पांडुरंग कर्डिले यांच्यासह सर्व शिक्षक वृंदाने ऋषिकेशच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन करत दुःख व्यक्त केले.

हेही वाचा :

The post नाशिक : आईने गेम खेळण्यासाठी मोबाइल न दिल्याने मुलाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Exit mobile version