Site icon

नाशिक : ऊसाच्या शेताला आग, दोनवाडेत अडीच एकर ऊस खाक

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

आधीच शेतमालाला भाव मिळत नाही त्यातच बेमोसमी पावसामुळे बळीराजा हातघाईस आला असून, अशा परिस्थितीत असताना दोनवाडे येथील विष्णू धिगणराव पावसे या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युततारा पडून अडीच एकर क्षेत्रातील उसाचे पीक जळून खाक झाले. यात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे.

दोनवाडे येथील विष्णू धिगणराव पावसे यांची नानेगाव शिवारात सर्व्हे नं. ८७३/११ अडीच एकर क्षेत्रांत ऊस लागवड केली असून, याच क्षेत्रामधून विद्युत तार गेलेली आहे. या विद्युत तारा वाऱ्याने एकमेकांना घासल्या गेल्याने उसाच्या पिकावर पडून ठिणग्यांमुळे उसाने पेट घेतला. बघता बघता आगीचे लोळ वाढले याबाबत पावशे यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशन महावितरण महामंडळ तसेच कॅन्टाेन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलास फोनद्वारे माहिती देताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत उसाचे क्षेत्र जळून खाक झाले होते. विद्युत मंडळांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत विद्युत तारा पडल्यामुळे नुकसान झाले आहे. याबाबत महावितरण कंपनीने व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याची नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : ऊसाच्या शेताला आग, दोनवाडेत अडीच एकर ऊस खाक appeared first on पुढारी.

Exit mobile version