Site icon

नाशिक : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महिला काँग्रेस रस्त्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू व ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन सुरू आहे. खेळाडूंच्या आंदोलनाला देशभरात वाढता पाठिंबा मिळत आहे. नाशिक शहर महिला काँग्रेसने या खेळाडूंना समर्थन देत कॅण्डल मार्च काढला. शालिमार येथील स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या पेटवून खेळाडूंच्या आंदोलना पाठिंबा दर्शविला आहे.

भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील सरकार भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा खासदार ब्रीजभूषण सिंग यांना पाठीशी घालत आहे. देशाचे नाव जगभर प्रसिद्ध करणाऱ्या खेळाडूंवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे ब्रीजभूषण सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड यांनी केली. तर आंदोलनकर्त्या खेळाडूंना न्याय नाही मिळाला तर राज्यस्तरावर आंदोलनाचा इशारा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती जाधव यांनी दिला.

यावेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, माजी नगरसेविका वत्सला खैरे, मध्य नाशिक ब्लॉक अध्यक्ष बबलू खैरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल पाटील, एनएसयूआयचे अध्यक्ष अल्तमश शेख, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, ओबीसी सेल शहराध्यक्ष गौरव सोनार, जावेद इब्राहिम, प्रा. प्रकाश खळे, फारूक मन्सुरी, स्मिता भोसले, मीरा साबळे, अरुणा आहेर, वृंदा शेरे, सोफीया सिद्दिकी, कुसुम चव्हाण, सुमन पगारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ महिला काँग्रेस रस्त्यावर appeared first on पुढारी.

Exit mobile version