नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
घरातील गॅस सिलिंडर परत मागितल्याचा राग आल्याने भावाने बहिणीचे डोके भिंतीवर आपटून दुखापत केल्याची घटना कुमावतनगर येथे घडली. दैव बलवत्तर म्हणून यात महिलेचा जीव वाचला आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकीकडे बहिणीच्या सुखासाठी सर्वस्व त्यागण्यासाठी भाऊ कायम तत्पर असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे किरकोळ गोष्टींसाठी थेट भाऊच बहिणीच्या जिवावर उठल्याची घटना पंचवटी परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संघमित्रा मलिक पवार (३८ रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) या आपल्या आईसोबत संशयित भाऊ नागसेन बापूसाहेब पगारे (रा. कुमावतनगर, मखमलाबाद रोड) याच्या घरी सिलिंडर परत मागण्यासाठी गेल्या. मात्र, संशयित नागसेन याने आईशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. हुज्जतीचे प्रकरण थेट हाणामारीत झाले. यामध्ये बहीण संघमित्रा यांचे डोके संशयित नागसेन याने भिंतीवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला.
मारहाणीनंतर जखमी संघमित्रा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संशयित नागसेन पगारे याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला उपनिरीक्षक पी. वाय. बागूल करीत आहे.
हेही वाचा :
- मंचर : दुचाकीवरील दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला
- पुणे : वसुलीसाठी खासगी कर्मचारी? आरोग्यमंत्र्यांच्या आरोपाची पालिका करणार चौकशी
- Aaditya Thackeray : शिंदे-फडणवीस सरकार गुत्तेदारी व टक्केवारीवाल्यांच्या हिताचे; आदित्य ठाकरे
The post नाशिक : गॅस सिलिंडर मागितल्याचा राग आल्याने बहिणीचे आपटले डोके appeared first on पुढारी.