Site icon

नाशिक : ग्रामपंचायतींच्या ३५० जागांसाठी १८ मे रोजी मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींमधील ३५० रिक्त जागांसाठी तसेच थेट सरंपचपदासाठी ६ ठिकाणी १८ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. इच्छुकांना येत्या २५ तारखेपासून नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. निवडणूक घोषित झाल्याने संबंधित प्रभागांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ३४ जिल्ह्यांमधील २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ रिक्त पदे तसेच १२६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडीसाठी पोेटनिवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. नाशिक जिल्ह्यातील ३५० रिक्त तसेच ६ थेट सरपंचांच्या जागेचा यात समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत शासकीय सुटी वगळून अर्ज दाखल करता येणार आहे. दाखल अर्जांची छाननी ३ तारखेला केली जाईल. 8 एप्रिलला दुपारी 3 पर्यंत माघारीची मुदत असून त्यानंतर रिंगणातील अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाईल. त्यानंतर १८ मे रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 यावेळेत मतदान, तर १९ मे रोजी तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २४ मेपर्यंत निवडणूक निकालाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यातील तब्बल २४२ ग्रामपंचायत क्षेत्रांतील निवडणुका घोषित झाल्याने पुढील महिनाभर संबंधित ठिकाणी प्रचाराच्या फैरी झडताना दिसून येतील. त्यामूळे आधीच उन्हाचा कडाका त्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे गावाेगावीचे वातावरण अधिकच तापणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ग्रामपंचायतींच्या ३५० जागांसाठी १८ मे रोजी मतदान appeared first on पुढारी.

Exit mobile version