Site icon

नाशिक : चंदन चोरटे पुन्हा सक्रीय ; देवळाली कॅम्पला तीन झाडांचा बुंधा लंपास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
चंदन चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत असून, त्यांनी देवळाली कॅम्प येथील सैनिकी परिसरातून चंदनाचे वृक्ष कापून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शहरात गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह, टपाल कार्यालय, विशेष पोलिस महानिरीक्षकांचे शासकीय निवासस्थान, औद्योगिक वसाहती आदी शासकीय व संवेदनशील समजल्या जाणार्‍या परिसरातून चोरट्यांनी चंदनाचे वृक्ष तोडून नेले होते. या प्रकरणातील संशयितांना पोलिसांनी पकडले होते. त्यामुळे चंदनचोरीचे प्रकार घडले नव्हते. मात्र, काही दिवसांनी पुन्हा चंदन चोरटे सक्रिय होत सैनिकी क्षेत्रातच चोरी करून पुन्हा पोलिसांसमोरील आव्हान वाढवले आहे.

देवळाली कॅम्प भागातील वडनेर रस्त्यावरील सैनिकी क्षेत्रात महिंद्रा एन्क्लेव्ह हा बंगला असून, या बंगल्याच्या आवारातून दि. 20 ते 21 जुलै दरम्यान रात्री चंदनाच्या तीन झाडांचा बुंधा चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी तानाजी सूर्यभान राऊत (40, रा. उमराव विहार, देवळाली) यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.

हेही वाचा :

The post नाशिक : चंदन चोरटे पुन्हा सक्रीय ; देवळाली कॅम्पला तीन झाडांचा बुंधा लंपास appeared first on पुढारी.

Exit mobile version