Site icon

नाशिक : चाकणमधून वाहन चोरणारा नाशिकला गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून छोटा टेम्पो वाहन चोरणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अंबड परिसरातून जेरबंद केले आहे. अनिल यादव (३०, रा. उत्तर प्रदेश) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित अनिल यादव हा एमएच १४ केए ९६७८ क्रमांकाच्या टेम्पोवर चालक म्हणून कामास होता. त्याने सोमवारी (दि.२०) मालकाच्या संमतिविना वाहन नेले. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, संशयित अनिल हा चोरीच्या वाहनासह अंबड लिंकरोडवर आल्याची माहिती पोलिस हवालदार गुलाब सोनार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अंबड लिंकरोडवर पाहणी केली असता वाहनासह अनिल यादव आढळला. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांचा ताबा चाकण पोलिसांकडे दिला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, अंमलदार सोनार, सोमनाथ शार्दुल, सुनील आहेर, प्रकाश बाेडके, सुगन साबरे, प्रशांत वालझाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक : चाकणमधून वाहन चोरणारा नाशिकला गजाआड appeared first on पुढारी.

Exit mobile version