Site icon

नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड भागातील वनश्री कॉलनी येथे राहत्या घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत पोलिसांनी माहिती दिली की, भूषण भारंबे (वय ४१) हा वनश्री कॉलनी येथे रो हाऊस मध्ये राहतो. बुधावरी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुलगा भूषण घरात दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यासाठी वडील घराच्या छतावर गेले, तेव्हा छतावरील एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत त्यांना भूषण मृतदेह दिसला. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. भूषण यांना त्वरीत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केले.

अंगावर कुठलेही व्रण नसल्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मयत भूषण हा खासगी नोकरीला होता तर त्याची पत्नीसुध्दा खासगी नोकरी करत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : छतावरील पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Exit mobile version