Site icon

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मंगळवारी (दि.6) दुपारी 3 पर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असणार आहे. त्यानंतर खर्‍या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असल्याने सार्‍यांचेच लक्ष आता माघारीकडे लागले आहेत.

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील 88 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यामध्ये दिंडोरीमधील 50, कळवणच्या 22 आणि नाशिक तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच पदासाठी 375 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच 241 प्रभागांसाठी तब्बल 1 हजार 734 इच्छुक उमेदवार नशीब आजमावत आहेत. निवडणुकीत अर्ज छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सार्‍यांचेच लक्ष आता नामनिर्देशन पत्राच्या माघारीकडे लागलेले आहे.

अर्ज माघारीसाठी मंगळवारी (दि.6) दुपारी 3 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच रिंगणात राहिलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. तसेच 18 सप्टेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान व दुसर्‍या दिवशी 19 ला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, माघारीनंतरच निवडणुकीचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच बुधवारपासून (दि.7) पुढील 10 दिवस निवडणुका होऊ घातलेेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडणार आहे. त्यामुळे मतदारांना राजकीय मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट, माघारीसाठी अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Exit mobile version