Site icon

नाशिक : ठाकरे गटात प्रवेशाचा डॉ. अपूर्व हिरेंनी केला इन्कार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मला कोणतीही अडचण नाही. पक्षाचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे व पक्षात राहूनच महाविकास आघाडी युतीचा धर्म पाळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी दिल्याने ठाकरे गट शिवसेना प्रवेशावरील चर्चेवर सध्या पडदा पडला आहे.
काही दिवसांपूर्वी माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी अद्वय हिरे यांच्यासमवेत ठाकरे गटाचे खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत धुळे लोकसभा मतदारसंघ, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ व नाशिक लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघांमध्ये निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरे गट महाविकास आघाडीचे घटक आहेत. राष्ट्रवादी पक्षात मला कोणतीही अडचण नाही. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करताना पक्षात राहूनच युतीचा धर्म पाळणार असल्याची माहिती माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी दिली. त्यामुळे ठाकरे गटात प्रवेशाच्या वृत्तावर त्यांनी पडदा टाकला.

हेही वाचा:

The post नाशिक : ठाकरे गटात प्रवेशाचा डॉ. अपूर्व हिरेंनी केला इन्कार appeared first on पुढारी.

Exit mobile version