Site icon

नाशिक : डोक्यावर खोके घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलन

देवळा : पुढारी वृत्तसेवा

देवळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डोक्यावर खोके घेऊन ‘आपला ओके” कारभार करणाऱ्या भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी( दि. २०) आंदोलन करण्यात आले. पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

सध्या कांद्यासह कोणत्याही शेती मालाला योग्य बाजार भाव मिळत नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा गलथान कारभार करणाऱ्या सत्ताधारी गद्दार नेत्यांच्या कारभारावर जनता नाराज असल्याचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी(दि. २०) रोजी देवळा बस स्टँड पासून ते पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून खोके दाखवून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ, प्रांतिक सदस्य व बाजार समितीचे सभापती योगेश आबा आहेर, बाजार समितीचे माजी संचालक पंडितराव निकम, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस देवळा तालुका अध्यक्ष सुनिल (गोटू आबा) आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, शेतकी संघाचे चेअरमन कैलास देवरे, शहर अध्यक्ष दिलीप आहेर, महिला तालुका अध्यक्षा व जि. प. च्या माजी सभापती उषा बच्छाव, माजी सदस्या नुतन आहेर,  वनिता शिंदे, सरला सोनवणे, जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, धनंजय बोरसे, मयूर सोनवणे, सचिन बोरसे, बापू शिंदे, दत्तू आहेर, सतिष सूर्यवंशी आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : डोक्यावर खोके घेऊन राष्ट्रवादीचे आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version