Site icon

नाशिक : तैलिक महासभेने केला राहुल गांधींचा निषेध

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेली समाजाचे मानबिंदू व अभिमान आहेत. त्यांना चोर संबोधन राहुल गांधी यांनी समस्त तेली समाजाचा अपमान करून तेली समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचवण्याचे काम केले असून त्याचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा सभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांना नुकतेच देण्यात आले.

यावेळी जिल्हा आघाडीच्या सुनिता बोरसे, योगिता दुर्गुड, शकुंतला शिरसाट,कविता बिरारी, भारती चौधरी, सुजाता कस्तुरे, महानगर आघाडीचे सागर कर्पे, राजेंद्र लोखंडे, वसंत चौधरी ,राहुल गणोरे, निलेश खैरनार, स्वप्नील खैरनार, अर्जुन वेताळ, दिलीप चौधरी, विनायक सोनवणे ,युवा आघाडीचे अरुण क्षीरसागर, शुभम नेरकर, अमर व्यवहारे, वैभव कर्पे, मोहित पन्हाळे उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : तैलिक महासभेने केला राहुल गांधींचा निषेध appeared first on पुढारी.

Exit mobile version