Site icon

नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक (देवळा) ; पुढारी वृत्तसेवा 

शासनाच्या वतीने शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा अखेर तालुक्यात पोहचला आहे. या शिधा वाटपाची सुरुवात झाली आहे.  तालुक्यातील सर्व रेशन दुकानांत हे किट कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

राज्य शासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेसाठी दिवाळी पासून आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिला आहे. आता गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्राप्त झालेल्या या किटचे वाटप गुंजाळ नगर येथील रास्त भाव दुकानातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी भाऊसाहेब आहेर, दुकानदार योगेश गुंजाळ, चेतन गुंजाळ आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील महिलांनी आनंदाचा शिधा वेळेवर मिळाल्याने आनंद व्यक्त केला. या किट मध्ये एक किलो डाळ, एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो गोड तेल या‌ चार वस्तूंचा समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

Exit mobile version