Site icon

नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको परिसरातील अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी संशयित आरोपी विरोधी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वर त्र्यंबक पाटील (५६, रा. सिडको) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित चिमुरडीला वडील नाहीत. तसेच, संशयित ज्ञानेश्‍वर पाटील हा पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा असून, घराजवळच राहत आहे. संशयिताने पीडित अल्पवयीन मुलीला रस्त्यात एकटीला अडविले आणि पीडितेच्या घराच्या पाठीमागे नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच, तुला वडील नाहीत. सदरचा प्रकार तुझ्या आईला सांगितलास तर तुला आणि तुझ्या आईला मारून टाकेन. पोलिसांना सांगितले तर घरातील सर्वांना संपवून टाकीन, अशी धमकीही दिली. या प्रकाराचा चिमुकलीला त्रास होऊ लागल्याने हे प्रकरण उघडकीस आले.

पीडितेच्या आईने अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार संशयित ज्ञानेश्‍वर त्र्यंबक पाटील विरोधात पोस्को (बाल लैगिंग अत्याचार संरक्षण अधिनियम) अन्वये बलात्कार व ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगिरथ देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.

हेही वाचा

The post नाशिक : नऊ वर्षाच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार appeared first on पुढारी.

Exit mobile version