Site icon

नाशिक : नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात राज्यातील आदिवासी बांधवाचा एल्गार

नाशिक (सप्तशृंगीगड) प्रतिनिधी :

आदिवासी बांधवांच्या हक्काच्या आरक्षणाचे पुन्हा तुकडे पाडले जाण्याचे मनसुबे असल्याच्या हालचालींमुळे आदिवासींनी आता त्या विरोधात राज्यस्तरीय लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 15 जुलै रोजी नाशिक येथे आदिवासी बांधवांनी एल्गार मोर्चा पुकारला आहे. या एल्गार मोर्चाचे नेतुत्व विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ करणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.

आदिवासींमध्ये इतर जमातींना आरक्षण दिले जाऊ नये अशी भूमिका आदिवासींनी घेतली आहेे. दिंडोरी रोडवरील नाथकृपा लाॅन्स येथे सर्व आदिवासी प्रतिनिधी व आदिवासी बांधव व विविध संघटना यांची बैठक झाली.  यावेळेस आमदार मंजुळा गावीत (साक्री), राजेश पाडवी (निकोज), हिरामण खोसकर (इगतपुरी), सुनील भुसारा (जव्हार), दिलीप बोरसे (सटाणा) नितिन पवार (कळवण), राजेश पाटील (विक्रमगड), माजी मंञी पदमाकर वळवी, माजी आमदार निर्मला गावीत, शिवराम झोले, माजी खासदार हरिच्रद चव्हाण, माजी महापौर रंजना भानसी, नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक सह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

धनगर आरक्षण संबधी हायकोर्टात 13 ते 14 तारखेला सुनावणी होणार असून त्यापार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही समाजांना आपली भुमिका येत्या दोन दिवसांत कोर्टात मांडावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. धनगरांना आदिवासींचे आरक्षण सोडुन कुठेही आरक्षण द्या अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे. त्यासाठी 15 जुलै ला आदिवासींनी एल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे.

प्रसंगी आदिवासी बचाव संघटनेनेचे राम चैरे, अशोक बागुल, के.के गागुर्डे, महादेव कोळी, कैलास शार्दुल, देवा वटाणे, रावण संघटनेचे विकी मुंजे, आदिवासी शक्ती संघटनेचे रोशन गांगुर्डे, अॅड दत्तु पाडवी, नगरसेवक योगेश शेवरे, शशिकांत मोरे, लकी जाधव, कौशल्या गवळी, चेतन खबाईत, सुरेश पवार तसेच साक्री, नंदुरबार, जव्हार, पुणे, धुळे, नाशिक येथील आदिवासी बाधव मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात राज्यातील आदिवासी बांधवाचा एल्गार appeared first on पुढारी.

Exit mobile version