Site icon

नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी

सिडको : पुढारी वृत्तसेवा

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पांडवलेणीच्या पायथ्याशी भरणाऱ्या महादेवाच्या यात्रेला यंदा तुफान गर्दी झाली होती. पाथर्डी फाटा ते फाळके स्मारकाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्व्हिस रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. इंदिरानगर पोलिसांच्या परिश्रमानंतर सायंकाळी सात वाजता वाहतूक सुरळीत झाली.

पांडवलेण्याच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पण कोरोनामुळे ती दोन वर्षे बंद होती. पाथर्डी ग्रामस्थ या ठिकाणी परंपरेनुसार पूजाविधी करतात. यात्रेत खेळणी, खाऊ, किरकोळ वस्तूंच्या दुकानांतून दिवसभरात लाखोंची उलाढाल झाली. त्र्यंबकेश्वर, घोटी, वाडीवऱ्हे, गोंदे, पाथर्डी, पिंपळगाव खांब, वडनेर, नाशिकरोड आणि शहरातील हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. याठिकाणी तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या मातीच्या आखाड्यात कुस्त्यांच्या दंगल रंगली. माजी नगरसेवक सुदाम डेमसे आणि भगवान दोंदे यांनी कुस्त्यांचा प्रारंभ केला. माजी नगरसेवक संजय नवले, सुनील कोथमिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोमनाथ बोराडे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, विभागप्रमुख त्र्यंबक कोंबडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा:

The post नाशिक : पांडवलेणीच्या महादेव यात्रेला तुफान गर्दी appeared first on पुढारी.

Exit mobile version