Site icon

नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना मनमाड पासून जवळ पुणे-इंदोर महामार्गांवर घडली आहे. आग लागल्या नंतर सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे यामार्गांवरील वाहतूक 2 किमी पर्यंत लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रक मध्ये गॅस ने भरलेले सुमारे 200 सिलिंडर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत, मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान नाशिकमध्ये आज आगीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. पहाटेच्या सुमारास नाशिकमधील हॉटेल मिर्ची येथील सिग्नलवर बसचा व ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातात आग लागून बस खाक झाली. या दुर्घटनेच तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला. दुसरी घटना, वणी येथे सप्तशृंगीगडावर एका बसने पेट घेतला. सुदैवाने प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली.  तिसरी घटना मनमाड पुणे -इंदोर महामार्गावर घडली. गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट झाले.

The post नाशिक : पुणे-इंदोर महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने स्फोट appeared first on पुढारी.

Exit mobile version