Site icon

नाशिक : बंगल्यासमोरून क्रेटा केली लंपास

नाशिक, निफाड : पुढारी वृत्तसेवा

परिसरात वाहन चोरट्यांची हिंमत वाढली असून, भरवस्तीतील बंगल्यासमोर उभी केलेली क्रेटा कार चोरट्यांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वाहनचोरीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निफाड पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड यांनी आपल्या बंगल्यासमोर उभी केलेली पांढऱ्या रंगाची क्रेटा कार बुधवारी (दि. 19) पहाटे 2.30 च्या सुमारास चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून चोरून नेली. या वाहनचोरीचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात नोंद झाला आहे. यापूर्वी चार ते पाच दिवसांपूर्वी नवीन तहसील कार्यालय आवारात तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने उभी केलेली नवी कोरी ज्युपिटर दुचाकी भरदिवसा चोरीस जाण्याचाही प्रकार घडला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बंगल्यासमोरून क्रेटा केली लंपास appeared first on पुढारी.

Exit mobile version