Site icon

नाशिक : बंद घरातून घरमालकाने ११ लाख चोरले; भाडेकऱ्याचा आरोप

नाशिक : बंद घराचे कुलूप तोडून घरातील ११ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घरमालकाने चोरल्याचा आरोप भाडेकरूने केला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरमालकाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्मिता पांडुरंग बोडके (रा. के. के. वाघ कॉलेजजवळ, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार घरमालक सरोज राहुल हरदास, अनिरुद्ध व राहुल हरदास या तिघा संशयितांनी २० जानेवारी ते १६ एप्रिलदरम्यान घरफोडी केली. स्मिता यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोकड व दागिने चोरून नेले. स्मिता या जानेवारीपासून घराला कुलूप लावून गेल्या होत्या. त्यानंतर घरमालकाने कुलूप तोडून घराचा ताबा घेतल्याचे स्मिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक : बंद घरातून घरमालकाने ११ लाख चोरले; भाडेकऱ्याचा आरोप appeared first on पुढारी.

Exit mobile version