Site icon

नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ 

ञ्यंबकेश्वर : येथे ब्रह्मगिरीवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हा मृतदेह पडलेला होता. त्यामुळे तो कुजून दुर्गंधी सुटली होती.

याबाबत मंगळवारी (दि. 4) ब्रह्मगिरीवर पूजेसाठी दररोज जाणारे प्रवीण गुलाबराव देशमुख (वय ५२) यांनी ञ्यंबक पोलिस ठाण्यात फोनद्वारे खबर दिली. पोलिसांनी पाहणी केली असता जटा मंदिरापासून ५० ते ६० मीटर अंतरावर नंदीचा खांडा डोंगरावरून खाली पडून डोक्याला व तोंडाला मार लागून कुजलेल्या स्थितीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. मृताचे अंदाजे वय ४५ ते ५० असून, शरीर कुजल्याने त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. जागेवरच पोस्टमार्टेमसाठी वैद्यकीय अधिकारी मिळाले नाहीत. अखेर पोलिसांनी मृतदेह खाली आणला. त्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी रवाना केला. दरम्यान याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अनोळखी व्यक्तीबाबत माहिती मिळाल्यास ञ्यंबक पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : ब्रह्मगिरीवर कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

Exit mobile version