Site icon

नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास

पंचवटी /नाशिक : मखमलाबाद येथील स्वामीनगर परिसरात चोरट्याने घरफोडी करून दोन लाख 76 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. किरण व्ही. टाक (33, रा. स्वामीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले 42 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : मखमलाबादला तीन लाखांची घरफोडी, दागिन्यांसह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Exit mobile version