Site icon

नाशिक : मनोरुग्ण महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले

नाशिक : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली. रुपाली गणेश भोट (३६) असे या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली मनोरुग्ण होत्या. त्यांनी सोमवारी (दि. ८) सकाळी ७.३० च्या सुमारास स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : मनोरुग्ण महिलेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले appeared first on पुढारी.

Exit mobile version