Site icon

नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन आणि संविधान प्रचारक लोक चळवळ यांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार (दि.११) रोजी एक दिवसीय संविधान साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सायं. ५.०० पर्यंत विद्यापीठाच्या यश इन इंटरनॅशनल कन्वेशन सेंटर येथे ही कार्यशाळा होत असल्याची माहिती अध्यासनाचे प्रमुख प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी दिली.

संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये संविधानाचा पूर्ण सार दिलेला आहे. या एक दिवसीय कार्यशाळेत ते समजून घेता घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एक दिवसीय कार्यशाळेत संविधानाची प्रस्तावनेतील प्रत्येक शब्द, मुल्ये, मुलभूत वैशिष्ट्ये साध्या सोप्या भाषेत, सोपी उदाहरणे देवून काही वेळेला प्रात्यक्षिके घेवून समजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही एक दिवसीय कार्यशाळा पुढील टप्प्यानुसार घेतली जाईल. पहिला कार्यशाळा सुरु झाल्यानंतर एखाद्या ॲक्टीव्हीटीच्या माध्यमातून सहभागीची ओळख करून घेणे, दुसरा कागदी गोळ्यांचा खेळ घेवून सर्वाना एकत्र राहण्यासाठी नियमांची गरज असते ह्यावर चर्चा करणे, तिसरा भारतीय संकृती आणि इतर घटकांचा संविधानाशी संबंध याबाबत चर्चा करणे, चौथा सागरी बेटांचा खेळ घेवून संविधान निर्मितीची प्रक्रिया यावर चर्चा करणे, पाचवा सहभागींचे ८ गट तयार करून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमधील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये गटचर्चेच्या माध्यमातून समजून घेणे, वैयक्तिक, कुटुंब आणि समुदाय-समाज पातळीवर संविधान मूल्यांच्या प्रचार व प्रसारासाठी पुढील कृती कार्यक्रम ठरविणे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी https://forms.gle/ezDv1zKvgJWgJjHa8 या लिंकद्वारे गुगल फॉर्म भरुन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेश फक्त ५० प्रशिक्षणांर्थींसाठी मर्यादित आहे. नावनोंदणी केल्यानंतर https://chat.whatsapp.com/LcITZPTF4s598LKkAZKyzY या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मुक्त विद्यापीठात आज संविधान साक्षरता कार्यशाळा appeared first on पुढारी.

Exit mobile version