नाशिक : एकाने अत्याचार केला तर त्याच्यासह त्याच्या पत्नीने याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पीडितेने आडगाव पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित रंजीत पाटील, वृषाली पाटील (रा. पंचवटी) यांच्याविरोधात बलात्कार, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
संशयित रंजीत याने ५ मार्चला मध्यरात्री अत्याचार केला. त्यानंतर रंजीत व वृषाली पाटील यांनी पीडितेस धमकावत याबाबत कोणाला सांगितल्यास कुटूंबियांना जीवे मारण्याची तसेच पीडितेच्या पतीविरोधात बलात्काराची खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- OIC : ओआयसीची मानसिकता जातीयवादी, भारतविरोधी अजेंडा दिसतो : परराष्ट्र मंत्रालय
- सातारा : बंदूक परवाना जिल्ह्याचा.. वापर राज्याचा
The post नाशिक : महिलेवर अत्याचार करुन जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.