Site icon

नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र

नाशिक : पुढारी ऑनलाइन

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे हे राज्यपालांना नाशिक शहरातून ६ हजार पत्र पाठविणार आहे. याची सुरवात शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे यांनी केली.

”गुजराती आणि मारवाडी लोक मुंबई व ठाण्यातून निघून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही” असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते. राज्यपालांच्या या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. युवक राष्ट्रवादी राज्यपालांना मानसिक आजारातून बरे होण्याचा सल्ला देणारे ६ हजार पत्र पाठविणार आहे.

आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुष यांचा अवमान करीत आहात. महाराष्ट्र राज्याचा एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे की, आपण महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की, महाराष्ट्राचा द्वेष करण्यासाठी राज्यपाल आहात.  महाराष्ट्राचा द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हाल असे युवक राष्ट्रवादीच्या पत्रात नमूद केले आहे.

यावेळी धनंजय निकाळे, संजय खैरनार, राजेंद्र शेळके, शादाब सय्यद, जय कोतवाल, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, डॉ. संदीप चव्हाण, करण आरोटे, योगिता पाटील, सरिता पगारे, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, मोतीराम पिंगळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र appeared first on पुढारी.

Exit mobile version