Site icon

नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

इगतपुरी येथील गतिमंद विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत विषबाधा झाल्याने दोन गतिमंद विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर असून त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर चार विद्यार्थ्यांवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेमुळे इगतपुरीसह जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.

या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. हर्षल गणेश भोईर (23) रा. भिवंडी, मोहम्मद जुबेर शेख (१०) रा. नाशिक या दोन विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. देवेंद्र बुरंगे  (१५), प्रथमेश बुवा (१७) या विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उर्वरित सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी सुरु झाली असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख पथकासह दाखल झाले आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नाचे नमुने जमा करण्यात आले असून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय, रखमाबाई अपंग युवक स्वयंसहायता केंद्र असे या गतिमंद विद्यालय चालवणाऱ्या संस्थांची नावे आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : विषबाधा झाल्याने आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version