Site icon

नाशिक : वेताळ बाबा यात्रोत्सवात रंगला बैलघोडा शर्यतीचा थरार…

नाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील वेताळ बाबा यात्रोत्सवात सालाबादप्रमाणे यंदाही बैलघोडा शर्यंतीचा थरार व कुस्त्यांची दंगल पाहायला मिळाली. 24 ते 26 मार्च या कालावधीत झालेल्या या यात्रोत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्यने हजेरी लावली होती. मोठ्या उत्साहात वेताळ महाराज यात्रा उत्सव पार पडला.
पहिल्या दिवशी सकाळी वेताळबाबा यांची बैलगाडीतून सनईच्या तालासुरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लेझिम पथकाने विविध कलाविष्कार सादर केले.  दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.  कुस्तीप्रेमीसाठी कुस्त्यांची दंगल खास मेजवानी ठरली. तर 26 मार्च हा दिवस खऱ्या अर्थाने डोळ्याचे पारने फेडणारा ठरला. राजा ग्रुपच्या वतीने बैलघोडा (टांगा) शर्यत झाली.यावेळी बैलघोडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला.

यावेळी कार्यक्रमाला हिरामण खोसकर, सीमंतिनी कोकाटे उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी सरपंच अश्विनी भोईर, उपसरपंच,  सदस्य, पोलिस पाटील व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

The post नाशिक : वेताळ बाबा यात्रोत्सवात रंगला बैलघोडा शर्यतीचा थरार... appeared first on पुढारी.

Exit mobile version