Site icon

नाशिक : शहरातील अशोकस्तंभाला झळाळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेकडून शहरातील अशोकस्तंभ आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले असून, स्वातंत्र्यदिनी आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

सुशोभीकरणामुळे संपूर्ण चौकाचे रुपडे पालटल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. दीपक बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे यांनी सामाजिक बांधिलकीतून या कामासाठी 15 लाखांची मदत केली आहे. तसेच पुढील 10 वर्षांसाठी त्यांनी अशोकस्तंभाच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी स्वीकारली आहे. या कामाचे डिझाईन आर्किटेक्ट विशाल घोटेकर यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, उपअभियंता नितीन राजपूत, विशाल तांबोळी आदींसह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : शहरातील अशोकस्तंभाला झळाळी appeared first on पुढारी.

Exit mobile version