Site icon

नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शहर पोलिस प्रयत्न करत असून, ते वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करीत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील मुंबई नाका सर्कल परिसरात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सर्कल अरुंद करण्यासह सिग्नल यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार मुंबई नाका येथे सायंकाळी ५.३० ते रात्री ८.३० या वेळेत सर्वाधिक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या वेळेत वाहन चालवताना चालकांना दक्ष राहण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. शहरातील इतर ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागातर्फे मुंबई नाका येथील ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार सायंकाळी मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने या सर्कलवरून मार्गस्थ होतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, द्वारकाकडे जाण्यासाठी सारडा सर्कल, गडकरी चौक या मार्गांचाही पर्यायी वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच शहरातील वाहतूक कोंडीची इतर ठिकाणे शोधली जात असून, तिथेही ड्रोन सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

हेही वाचा : 

The post नाशिक शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Exit mobile version