Site icon

नाशिक शहरात दोघींचा विनयभंग, एक अल्पवयीन

नाशिक : वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीसह एका तरुणीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आदेश बाळासाहेब खेलूकर (२३, रा. देवळाली गाव) याने ओंकारेश्वर मंदिराजवळ ७ ते १२ सप्टेंबरदरम्यान वारंवार पाठलाग केला. त्यामुळे पीडितेने त्याच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही असे सांगितले. मात्र आदेशने तिला मारहाण, शिवीगाळ केली. १२ सप्टेंबरला आदेशने तिच्या नातलगांना शिवीगाळ केली, तर पीडितेच्या मोठ्या बहिणीला मोबाइलवरून धमकावले. या प्रकरणी आदेशविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत संशयित किरण गाेतरणे (३५, रा. भारतनगर) याने ३० ऑगस्ट ते ११ सप्टेंबरदरम्यान अल्पवयीन पीडितेचा विनयभंग केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात किरणविरोधात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरात दोघींचा विनयभंग, एक अल्पवयीन appeared first on पुढारी.

Exit mobile version