Site icon

नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा – उपायुक्त खांडवी 

 नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक शिवजन्मोत्सव साजरा करताना शासनाच्या नियमांचे पालन करावे,  समाजाला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले.

१९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त अंबड पोलीस ठाण्यात सार्वजनिक मंडळाच्या बैठकीप्रसंगी खांडवी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलीस उपायुक्त खांडवी म्हणाले की, शिवजयंती साजरी करताना पोलिसांची परवानगी घ्यावी तसेच उत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घ्यावी. परवानगी घेताना कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा अर्जामध्ये नमूद करावी, पोलिसांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. यासाठी मंडळांनी संपर्क साधावा. मंडळांनी शिवरायांचे दिशादर्शक विचार हे समाजापुढे मांडून एक वेगळा आदर्श निर्माण करावा, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही होल्डिंग बाजी करू नये, मनपाने ठरवून दिलेल्या जागेतच होल्डिंग लावा असेही उपायुक्त खांडवी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित असलेल्या सार्वजनिक मंडळातील अधिकारी गणेश अरिंगळे, सुनील पाटील, अविनाश पाटील, भूषण राणे, प्रशांत खरात, अंकुश वराडे, प्रशांत जाधव, अँड  अजिंक्य गीते, देवेंद्र पाटील, पिंटू काळे, योगेश गांगुर्डे, देवेंद्र पाटील, समाधान ठोके, ज्ञानेश्वर उघडे, कैलास मोरे, विशाल डोके, हर्षल चव्हाण, मुकेश शेवाळे, सचिन पाटील, नितीन अमृतकर, शरद काळे, बाळासाहेब घुगे आदींसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पतकी यांनी मानले.

हेही वाचा : 

The post नाशिक : शिवजयंतीला नियमांचे पालन करा - उपायुक्त खांडवी  appeared first on पुढारी.

Exit mobile version