Site icon

नाशिक : संत ज्ञानेश्वरांच्या पंचधातूच्या मूर्तीने त्र्यंंबकेश्वराच्या वैभवात भर; ‘इतके’ आहे वजन

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथील महामंडलेश्वर रघुनाथ महाराज (फरशीवाले देवबाप्पा) यांच्या माउलीधाम आश्रमात संत ज्ञानेश्वरांची पंचधातूची दीड टन वजनाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मूर्तीची स्थापना दगडी मंदिरात करण्यात आल्याने त्र्यंंबकेश्वराच्या धार्मिक वैभवात भर पडली आहे.

तब्बल दीड टन(1500 किलो) वजनाची ही मूर्ती आहे.

या मंदिराच्या ओटा, भिंतींवर संपूर्ण ज्ञानेश्वरीतील ओव्या कोरण्यात आल्या आहेत. यावेळी वारकरी भाविकांनी भजन, कीर्तन करीत मूर्तीचे स्वागत केले. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारची माउलीची पंचधातूची मूर्ती माउलीधाम येथे असल्याचा दावा करण्यात आला आहे.  मूर्तिपूजेप्रसंगी महामंडलेश्वर रघुनाथ महाराज (फरशीवाले देवबाप्पा), मच्छिंद्र चाटे, छाया पाटील, निवृत्ती थेटे, उत्तम पेखळे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

पसायदानातून विश्वकल्याणाचा विचार मांडणार्‍या ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती आश्रमात असावी, अशी इच्छा होती. माउलींच्या कृपेने ती पूर्ण होत असल्याचे समाधान आहे.
– महामंडलेश्वर धन्वंतरी रघुनाथ महाराज,
माउलीधाम, त्र्यंबकेश्वर

हेही वाचा :

The post नाशिक : संत ज्ञानेश्वरांच्या पंचधातूच्या मूर्तीने त्र्यंंबकेश्वराच्या वैभवात भर; 'इतके' आहे वजन appeared first on पुढारी.

Exit mobile version