Site icon

नाशिक : सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघा भावांचे विष प्राशन; एकाचा मृत्यू

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून नाशिकरोड परिसरातील दोघा भावांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यातील एका भावाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मृत्यूनंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दर्शवत नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. त्यामुळे येथील परिस्थिती अतिशय संवेदनशील बनली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थीती नियंत्रणात आणली.

जगन्नाथ लक्ष्मण कांबळे, रविंद्रनाथ लक्ष्मण कांबळे असे विष प्राशन केलेल्या दोघा भावांचे नाव आहे. यातील रवींद्रनाथ कांबळे याचा मृत्यु झाला आहे. काही दिवसांपुर्वी संबधित सावकाराने दोघा भावांना मारहाण केली होती. याविषयी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली असल्याचे यावेळी नातेवाईकांनी सांगीतले.

The post नाशिक : सावकाराच्या जाचाला कंटाळून दोघा भावांचे विष प्राशन; एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Exit mobile version