Site icon

नाशिक : सावरकरांबद्दलचे युवा सेनेचे पोस्टर हटविले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर सावरकर यांच्या समर्थनार्थ युवा सेनेने रविवार कारंजा भागात पोस्टर झळकविले. मात्र त्यास परवानगी न घेतल्याने महापालिकेने हे पोस्टर काही वेळातच हटविले.

युवा सेनेचे नाशिक शहर विस्तारक योगेश बेलदार आणि युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी हे पोस्टर झळकविले होते. रविवार कारंजा भागात हे पोस्टर आकर्षण ठरले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्चपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रविवार कारंजा या भागात युवा सेनेचे योगेश बेलदार आणि हर्षदा गायकर यांनी पोस्टर उभारले होते.

हेही वाचा : 

The post नाशिक : सावरकरांबद्दलचे युवा सेनेचे पोस्टर हटविले appeared first on पुढारी.

Exit mobile version