Site icon

नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा

सिडको : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा सिडकोत समता मेळावा पवननगर येथील सुवर्णकार समाज भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब कर्डक होते. यावेळी व्यासपीठावर शहराध्यक्षा कविता कर्डक महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे, मकरंद सोमवंशी, मंदाकिनी जाधव, कविता नाईक, दिलीप तुपे, अहिरे, नितीन माळी, राहुल कापसे, किरण शिंदे, अमर वझरे, सागर मोटकरी, ज्ञानेश्वर महाजन, नाना पवार, अनिल नळे आदी उपस्थित होते.

शहराध्यक्षा कविता कर्डक यांनी आपल्या भाषणात सांगितले की ओबीसी समाजातील सर्व जातीतील बांधवांनी एकत्र वज्रमूठ तयार करून मनुवादी षड्यंत्र तोडणार असे संबोधले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब कर्डक यांनी ओबीसी आरक्षण सद्यस्थिती व समता परिषद विविध आंदोलने इत्यादी बाबत संबोधित केले.यावेळी महिला शहराध्यक्षा आशा भंदुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे आयोजन अमोल नाईक आणि त्यांचे सहकारी हरीश महाजन, कृष्णा काळे, रवींद्र शिंदे व सर्व मित्र परिवार नवीन नाशिकच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमास नितीन अमृतकर, करण आरोटे, विकी डहाळे, रोहित नाईक, सुनील घुगे, अक्षय परदेशी, अमोल पैठणकर, संतोष भुजबळ, मोरे, मंगला मोकळ, अश्विनी कलंत्री आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : सिडकोत समता परिषदेचा मेळावा appeared first on पुढारी.

Exit mobile version