Site icon

शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये, भुजबळांनी केलं स्वागत

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार हे दोन दिवसांसाठी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. आज मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे त्यांचे आगमन झाले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, सोबत माजी खासदार समीर भुजबळ देखील उपस्थित होते. शरद पवार हे आज आणि उद्या दोन दिवस नाशिकच्या दोऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

यावेळी ज्येष्ठ नेते हेमंत टकले, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post शरद पवार दोन दिवस नाशिकमध्ये, भुजबळांनी केलं स्वागत appeared first on पुढारी.

Exit mobile version