जळगाव: पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांना आपल्याच मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. खडसेंचा बालेकिल्ला असलेल्या बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात बोदवड नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा उमेदवारांनी विजय मिळविला होता. दोन दिवसांपूर्वी रावेर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणूका पार पडल्या. यापैकी चार ग्रामपंचायतींवर एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात झेंडा फडकावला. विजयाचा आनंद साजरा करत असतानाच खडसेंना हा धक्का बसला आहे.
दूध संघानंतर दुसरा झटका…
एकनाथ खडसेंच्या ताब्यातील जिल्हा दूध संघाची चौकशी लावून राज्य सरकारने प्रशासक मंडळ नियुक्त केले. त्याला काही दिवस उलटत नाही, तोवर बोदवड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटातील प्रवेश हा दुसरा मोठा धक्का खडसेंना बसला आहे.
हेही वाचलंत का ?
- CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकाची हॅटट्रीक, झरीनचाही गोल्डन पंच
- Friendship Day Tweet : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मैत्रीवरील अमृता फडणवीस यांचे सूचक ट्विट चर्चेत
- CWG 2022 : अन्नू राणीने भालाफेकीत पटकावले कांस्यपदक, भारताची एकूण पदकसंख्या ४७ वर
The post शिंदे गटाचा एकनाथ खडसेंना धक्का!; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार appeared first on पुढारी.